प्रतिनिधी/ वास्को
एका अनोळखी व्यक्तीने आपल्याला भ्रमीत करून आपल्या एटीएम कार्डचा वापर करून 1 लाख 15 हजार रूपयांना लुटल्याची तक्रार चिखली वास्को येथील फ्रांसिस्को जुआव फर्नांनडि यांनी वास्को पोलीस स्थानकात केली आहे.
ही घटना जवळपास वीस दिवसांपूर्वी वास्को शहरातील एका एटीएमवर घडली होती. एका अनोळखी व्यक्तीने आपल्याला भ्रमीत करून आपले लक्ष विचलीत केले व आपले कार्ड वापरून 1 लाख 15 हजार रूपयांची रोख एटीएमधुन काढली अशी माहिती तक्रारदाराने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी शनिवारी संध्याकाळी वास्को पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा नोंद केला आहेत.









