प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील अनाधिकृत वाळू वाहतूक व उत्खनन करताना पकडण्यात आलेल्या वाहनातील व जप्त केलेल्या एकूण 12 ब्रास वाळू साठय़ाचा लिलाव करण्यात येणार आहे. सदर लिलाव प्रक्रिया उपविभागीय अधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली दि. 26 नोव्हेंबर रोजी तहसिलदार कार्यालय सातारा येथे सकाळी 11 वा. पार पडणार आहे. तसेच सदर लिलाव प्रक्रिया पूर्ण न झाल्यास दि. 29 रोजी सकाळी 11 वा. तहसिलदार कार्यालयात पुन्हा लिलाव घेण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी वेळेत लिलावाच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे तहसिलदार कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.









