प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील पानगाव पासून बारा किलोमीटर अंतरावर ढोंण ओढ्यातुन अवैधरित्या वाळू चोरणारा ट्रॅक्टर बार्शी तालुका पोलिस यांनी आज दुपारी पकडला. याबाबत ट्रॅक्टर मालक संदीप ठाणेकर, (वय35), रा . उंडेगाव, ता, बार्शी. जिल्हा – सोलापूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, वाळू चोरणारा ट्रक्टर बार्शी तालुका पोलीस यांनी जप्त केला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, बार्शी तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस हवालदार बळीराम बेदरे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आज दुपारी बारा वाजनेच्या सुमारास मौजे पानगाव ते उंडेगाव रोडवरती असणारे ढोण ओढ्यातून एक महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर एम एच 13, बी आर 1373 व एक बिगर नंबर ची ट्रॉली हा ट्रक्टर अवैधरित्या पर्यावरणाचं ऱ्हास करून वाळू चोरून वाहयुक करीत होता.
त्यावेळी तालुका पोलिसांनी हा पाऊण ब्रास असणारा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. यात पोलीसांनी वाळू, ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण 4 लाख 80 हजार एवढ्या किंमतीचा माल जप्त केल्याची गुन्ह्यात नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने हे करीत आहेत.









