भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे जाधव यांचा आरोप
सातारा/ प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील तारळी नदी पात्रात वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर काल महसुल विभागाने कारवाई केली आहे. मात्र या कारवाईत नदी पात्रात वाळूची तस्करी करणारी वाहने ज्यांची आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ट्रॅकटर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे शशिकांत जाधव यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून दोन ट्रॅकटर आणि एक जेसीबी जप्त केला आहे.
याबाबत शशिकांत जाधव यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महसुल प्रशासनाने कारवाई केली. परंतु मूळ वाहन मालक आहेत त्यांना मोकाट सोडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, तारळे पोलिसात तलाठी अंबिदा सय्यद यांनी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार दि.26 रोजी दुपारी दीड वाजता नदी पात्रात राहुडे केटी वेअर जवळ अभिजीत विलास निकम ( रा दुटाळवाडी ता.पाटण), सुनील विठ्ठल खराडे ( रा.खराडे वस्ती नुने ता. पाटण), अनिल आण्णासो शेडगे (रा.तारळे ता. पाटण) हे तिघे वाळू उपसा करत होते. त्यांच्याकडून 4 हजार ब्रासची वाळू आणि 5 लाख किमतीचा ट्रॅक्टर ट्रेलर, पाच लाख किमतीचा ट्रॅक्टर व ट्रेलर MH 50 C 1308 आणि 17 लाख किमतीचा जेसीबी MH 50 L 4165 जप्त केला आहे. जेसीबी चालक दोन ट्रॅक्टर चालक त्यांचे विरुद्ध भा द वी स क 379,34 पर्यावरण अधिनियम 1986 चे कलम 9,15 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तलवार हे तपास करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








