वाळवा / वार्ताहर
वाळवा येथे भरदुपारी तरुणावर खुनी हल्ला झाला. साहिल उर्फ संदेश अशोक कदम (वय २५, रा. माळभाग वाळवा) याच्यावर दुपारी साडेबारा वाजता यामाहा गाडी वरून आलेल्या तिघांनी कोयत्याने वार केले. सचिन सुभाष चव्हाण ( वय २४, रा. पेठभाग वाळवा ), रोहीत हनुमंत मुळीक (वय २६, रा. माळभाग वाळवा ) आणि संदीप मुळीक (वय २५ रा. वाळवा माळभाग ) या अशी हल्ला करणाऱ्या तिघांची नावे असून तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी त्यांनी दिली. यामध्ये साहिल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.
या घटनेमागे रणजीत उर्फ चन्या मुळीकच्या खुनाचे धागेदोरे असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. रजनीश उर्फ चन्या मुळीक याचा गेल्या वर्षी खून झाला आहे. त्याच्या खुनामध्ये साहिल कदम गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस कस्टडीमध्ये होता. तो चार ते पाच महिन्यापूर्वी वाळवा येथे जामिनावर बाहेर आला होता. साहिलच्या मागावर रोहित मुळीक आणि त्याचे साथीदार होते. तीन मार्च रोजी देखील वाळवा हुतात्मा चौक येथे एका नेत्याच्या कार्यालयावर अचानक मुळीक बंधूंच्या साथीदारांनी धाड टाकली. त्यावेळी साहील आत मध्ये होता. कार्यालयाचे दार बंद केल्यामुळे तो वाचला. परंतु आज दुसऱ्या दिवशी साहिल उर्फ संदेश कदम हा शिरगाव येथे गेला असता, साडेबारा वाजता नदीच्या काठावर उभा असलेल्या साहीलला यामाहा गाडीवरून आलेल्या सचिन सुभाष चव्हाण, रोहीत मुळीक आणि संदीप मुळीक यांनी गाठले. अचानक त्यांनी कोयत्याने बारा ते तेरा वार करून मारेकरी पळून गेले.
साहीलच्या हातावर, पोटावर, छातीवर, पाठीवर कोयत्याने वार होत असताना तेथील लोक पळून गेले. साहीलच्या पोटावर छातीवर गंभीर वार झाल्याने त्याला उपचारासाठी सांगली येथे सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच इस्लामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, आष्टा पोलीस उपनिरीक्षक भानुदास निंबोरे आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाळव्यात खून का बदला खून हे सत्र सुरु झाल्यामुळे पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील करीत आहेत.
Previous Articleसांगली : मेंगाणवाडी, बलवडी परिसरात डोंगराला भीषण आग
Next Article मनीष कौशिक उपांत्यपूर्व फेरीत








