वार्ताहर / वाटेगाव
वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे शिराळा वनपरिक्षेत्र हद्दीमधील गणेश नगर मध्ये विकास साठे यांच्या घरासमोर सोमवारी रात्री खवले मांजर आढळले. याबाबत ग्रामस्थांनी प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे भाटवाडी येथील सर्पमित्र व प्राणीमित्र गणेश निकम यांना कळवले. निकम यांनी हे खवले मांजर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केले.
शिराळा तालुक्यातील पश्चिम आणि पूर्व भागात या खवले मांजरच्या प्रजातीचा अधिवास आहे. नागरिकांना अशा प्रकारे खवले मांजर अथवा इतर वन्यजीव आढळले तर त्यांनी तात्काळ वन विभाग अथवा प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनच्या सदस्यांना कळवावे, असे आवाहन निकम यांनी केले आहे. निकम यांनी खवले मांजराची माहिती घेवून वन विभागाच्या रेस्क्यू टीमला कॉल केला. त्यांच्या मदतीने हे खवले मांजर ताब्यात घेतले. त्यानंतर या मांजरास निर्जन अशा सुयोग्य नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या खवले मांजरास नैसर्गिक अधिवासात सोडत असताना प्राणीमित्र मीनाक्षी गणेश निकम, संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव महाजन, प्रोजेक्ट असिस्टंट प्रथमेश शिंदे, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक दिपाली सागावकर, अनिल पाटील, अंकुश खोत उपस्थित होते. या सर्वांना वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
Previous Articleमहाराष्ट्र : जळगावमध्ये वैमानिकांना प्रशिक्षण देणारे विमान कोसळले; एकाचा मृत्यू, एक जखमी
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात 25 मृत्यू, 1356 नवे रूग्ण









