गाईच्या पोटातून चाळीस किलो प्लास्टिक कचरा काढला
वाळपई / प्रतिनिधी
वाळपई नगरपालिका क्षेत्रातून प्लास्टिक निर्म?लन मोहीम दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. मात्र या मोहिमेस संदर्भात सध्यातरी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे .कारण वाळपई शहरात फिरणाऱया गुरांच्या पोटामध्ये प्लास्टिक आढळून येत आहे. दोन दिवसांपूर्वी वाळपई शहरातून आणण्यात आलेल्या एका गाईच्या पोटातून नाणूस येथील अखिल विश्व गोसंवर्धन केंद्राच्या पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी 40 किलो प्लास्टिक बाहेर काढण्याची घटना घडलेली आहे. यामुळे वाळपई शहरात अजूनही प्लास्टिक निर्म?लन मोहीम यशस्वी झाली नसल्याचे स्पष्ट झालेली आहे. याबाबतची माहिती अशी की वाळपई शहरात गेल्या दोन वर्षापासून प्लास्टिक फ्री मोहीम राबविण्यात आली होती. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहे. अनेक स्तरावर जनजागृती पत्रके वाटून यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. मात्र त्यासंदर्भात अजून पर्यंत नागरिकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे वाळपई शहरात अजून पर्यंत गंभीर अशी कारवाई न झाल्यामुळे यासंदर्भात अजूनही प्लास्टिक वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण दोन दिवसापूर्वी वाळपई शहरातील एक गाय आजारी अवस्थेत नाणूस येथील गोशाळेत आणण्यात आली होती .सदर गोशाळेमध्ये या गायीवर उपचार करण्यात येत असता तिच्या पोटातून जवळपास 40 किलो प्लास्टिक कचरा काढण्यास पशुवैद्यकीय अधिकाऱयांना यश आलेले आहे. यामुळे वाळपई शहराच्या बाजारामध्ये अजूनही प्लास्टिकचा वापर होत असल्याचे सिद्ध झालेले आहे.
यासंदर्भात गोशाळेचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी सांगितले की दोन दिवसापूर्वी शहरातून दोन गुंराना आजारी अवस्थेत गोशाळेमध्ये आणण्यात आले होते. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी रघुनाथ धुरी व इतरांनी उपचार करून शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटातून 40 किलो प्लास्टिकचा कचरा काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले .यापूर्वी अनेकवेळा शहरातून अनेक गुरांच्या पोटामधून प्लास्टिक कचरा बाहेर काढण्यात आला होता. सध्या सदर गायीवर उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे हनुमंत परब यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. नगरपालिकेने यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन प्लास्टिक मुक्त मोहीम राबविताना कायद्याचा वापर करून प्लास्टिक फ्री मोहिमेसाठी सहकार्य न करणाऱयावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन केलेले आहे. अनेकवेळा घरातील कचरा प्लास्टिक पिशव्यामध्ये घालून तो रस्त्यावर फेकण्यात येत असतो. मोकाट गुरे तो खात असल्याने प्लास्टिक पोटात जाते त्यामुळे अशा प्रकारची प्रकरणे घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे नगरपालिके बरोबरच नागरिकांनी सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









