वाळपई / प्रतिनिधी
कोरोना रोगाचा वाढता प्रसार यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावणाऱया वाळपई शहरातील पोलीस सार्वजनिक पाणीपुरवठा खाते वीज पुरवठा खाते आरोग्य खाते यांच्या कर्मचाऱयांचे वाळपई मतदारसंघात काँग्रेस समितीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. आज सर्व भागात फिरून मतदारसंघ काँग्रेस समितीचे अध्यक्ष दशरथ मांदेकर महिला अध्यक्षा रोशन देसाई सेवादलाचे अध्यक्ष कृष्णा नेने सचिव नंदकुमार कोपर्डेकर आदींनी करून सर्वांना पुष्पगुच्छ प्रदान केले व त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले. याबाबतची माहिती अशी की जागतिक स्तरावर मोठय़ा प्रमाणात कोरोना रोगाने हाहाःकार निर्माण केलेला आहे. या रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱया पोलीस व इतर संबंधित ात्याच्या कर्मचाऱयांनी दिलेले महत्त्वाचे योगदान याची विशेष दखल घेऊन काँग्रेस समितीने सर्वांचे अभिनंदन केले आहे. आज सर्वप्रथम वाळपई पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवराम वायंगणकर पोलिस स्थानकावरील कर्मचारी आरोग्य खात्याचे डॉक्टर कर्मचारी वीज पुरवठा खात्याचे अधिकारी व कर्मचारी पाणी पुरवठा खात्याचे कर्मचारी आदींना समितीच्यावतीने पुष्पगुच्छ प्रदान करून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना समितीचे अध्यक्ष दशरथ मांदेकर यांनी सांगितले गोव्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या ज्या सरकारी कर्मचारी, खाजगी संस्थांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे त्यांचे अभिनंदन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण न करता चांगल्यासाठी अभिनंदन करणे अशी काँग्रेस पक्षाची कामगिरी असून ती पुढे नेण्यासाठी वाळपई मतदारसंघातील काँग्रेस समितीचे कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या जिवाची पर्वा न करता वेगवेगळय़ा स्तरावर महत्त्वाचे योगदान देणाऱया या कर्मचाऱयांचे अभिनंदन करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयोग राबविण्यात आल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. तरीसुद्धा नागरिकांनी रोगाची तीव्रता गांभीर्याने ओळखून आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वां®ााr अंमलबजावणी करण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात करण्यात आले आहे.









