बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकारने दुचाकी वाहने, टीव्ही, फ्रिज किंवा पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या बीपीएल रेशनकार्डधारकांनी ३१ मार्चपर्यंत आपली रेशनकार्डे परत करण्यास तयार राहावे किंवा कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हंटले आहे.
अन्न व पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बीपीएल (दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी) कार्ड संदर्भात काही निकष आहेत. ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन, मोटर सायकल, टीव्ही, फ्रीज इत्यादी असू नयेत.जे लोक या निकषात बसत नसतील त्यांनी कार्ड परत करावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
मंत्री कत्ती यांनी वार्षिक १.२ लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांनी बीपीएल कार्ड वापरू नये आणि ते ३१ मार्चपूर्वी परत करावे असे म्हंटले आहे. मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर कॉंग्रेसने टीका केली आणिबेंगळूरमधील विविध रेशन दुकानांसमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धारवाड, म्हैसूर आणि तुमकूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
सरकारचा हा निर्णय ‘लोकविरोधी’ असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार यु. टी. खादर यांनी केला असून त्यांनी ‘बीपीएल कार्ड काढून घेण्याऐवजी अधिक लाभार्थी ओळखण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणले.









