तरुणांच्या दोन गटात झाली हाणामारी, तीघे जखमी, तरुणावर तलवारीने वार
कोल्हापूर : प्रतिनिधी
वारे वसाहत येथे किरकोळ कारणातून दोन गटात शनिवारी दुपारी राडा झाला. यामध्ये दोन्ही गटाकडून तालावर, एडका, काठ्यांचा वापर करण्यात आला. या घटनेत दोनही गटाचे तिघे जण जखमी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. पृथ्वी आवळे, सुजल कांबळे, यांच्यासह दादासाहेब माने अशी जखमींची नावे आहेत.









