वार्ताहर / कास :
तापोळा भागातील गोगवे गावाजवळ असलेल्या वारसोळी देव गावाच्या कमानी जवळ आज सकाळी दोन बिबटे डांबरी रस्त्यावरून सैर करताना आढळले. या बिबट्यांच्या जोडीची दिवसा सफर चर्चेचा विषय झाला असून, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारसोळी देव हे गाव तापोळा विभागातील सोळशी नदीच्या खोऱ्यात दुर्गम भागात वसले आहे. हा सर्व परिसरात झाडी, जंगल बरेपैकी आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर चांगला असतो. पण बिबट्याचे दर्शन तसे या भागात दुर्मिळ असते. अचानक आज चक्क बिबट्याच्या जोडीने फेरफटका मारला.
बिबट्या रस्त्यावर फिरत असताना या गोगवे गावातील वैभव रमेश जाधव हा चारचाकी मधून सातारा येथे निघाला असताना वारसोळी देव गावाच्या कमानी जवळ बिबटे पाहिले आणि त्यांचे फोटो टिपले.









