प्रतिनिधी / वारणानगर
वारणानगर येथील निवृत्ती कॉलनीत रहाणाऱ्या नवविवाहितेला घटस्फोट घे किंवा एक लाख रुपये माहेरहून आणावेत यासाठी सतत शारिरीक व मानसिक छळ करीत असल्याच्या कारणास्तव नवविवाहितेने पती,सासु, सासरे व नणंद या चौघा विरोधात कोडोली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची फिर्याद पीडित नावविवाहितेने दिली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित महिलेचे जानेवारी २०२० ला लग्न झाले होते. लग्न झाले पासून घरातील सगळे तुला स्वयंपाक, घरची कामे येत नाही असे म्हणत लग्नात मनासारखा मानपान झाला नाही म्हणून घटस्फोटाच्या कागद पत्रावर सहीकर किंवा माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणत उपाशी ठेवत मानसिक व शारीरिक त्रासदेत असल्याची फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पती किशोर नामदेव आवटे, सासरे नामदेव दत्तात्रय आवटे, सासू सुलभा नामदेव आवटे, नणंद अनुराधा रमेश जाधव सर्व रा. गॅलेक्सी हॉस्पिटल समोर निवृत्ती कॉलनी वारणानगर (ता.पन्हाळा) या चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक काटकर करीत आहेत.
Previous Articleम.फुले आरोग्य योजनेंतर्गत मोफत सेवा मिळणे आवश्यक – ना.टोपे
Next Article एकवटलेल्या आतल्या आवाजाची किमया









