प्रतिनिधी / वारणानगर
वारणा – कोडोलीसह परिसरात गुरुवारी सायकांळी साडेसहाच्या सुमारास जोरदार वारा व विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला. पावसापूर्वी सुरू झालेल्या अर्धा तास जोरदार वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे पडली. काही ठिकाणी विद्युत तारा तुटून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तर गावातील घरावरील कौले, पत्रे उडून गेले असून प्रांपचिक साहित्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या वाऱ्यात कोडोली गावात साखरवाडी, चर्चरोड, दत्तमठी या ठिकाणी तर शेतामधील अनेक ठिकाणी विद्युत तारेवर झाडे पडल्याची घटना घडल्या असून सातवे,सावार्डे सह अनेक गावात पडझड झाली आहे रात्री बऱ्याच वेळ हलक्या स्वरूपात पावसाची रिपरिप व विजेचा गडगडाट सुरु होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








