प्रतिनिधी/वारणानगर
येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाला बिहारच्या बरौनी सहकारी दूध संघाची प्रतिदिनी ६५ हजार लिटर मिल्क मिक्स कॉन्सनट्रेट दूध पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली असल्याची माहीती कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली. बिहारला दुधाने भरून जाणाऱ्या दूध टँकरचे पूजन दुग्धालयात कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते करून दूध विक्री शुभारंभ करण्यात आला. यामुळे वारणा दूध संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
यावेळी येडूरकर म्हणाले, दूध पावडर तयार करून बाजारात आणण्यापर्यंत दराच्या चढ -उताऱ्याला संघाला सामोरे जावे लागत होते. आतापर्यंत वारणा दूध संघामार्फत दूध, दूध पावडर व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध होते. आता उच्च प्रतिचे दूध पुरवठा करण्याचा करार दोन्ही संघा दरम्यान झाला. आज संघाचा पहिलाच टॅंकर बिहारला रवाना करण्यात आला. बिहारकडील प्रतिदिनी मागणीप्रमाणे ६० ते ६५ हजार लिटर दुध पुरवठा आता बिहारला होणार आहे.
यावेळी संघाचे प्रोडॅक्शन मॅनेजर एच.एन देसाई, अकौंटस मॅनेजर सुधीर कामेरीकर, टँकरमालक अनिल चिवटे, डेअरी मॅनेजर आर.बी.महाजन, इंजि.श्रीधर बुधाले, इनचार्ज मार्केटिंग मॅनेजरं एस.एल. मगदूम मार्केटींग अधिकारी अनिल हेर्ले, आर. व्ही.देसाई,आदिक पाटील, स्टोअर मॅनेजर अभिजीत भोसले, अनिल लंबे, सुरेश कापरे, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते..
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









