प्रतिनिधी / शिराळा
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून नदीपात्रात ५ हजार चारशे ८२ इतका विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात २७.४७ टीएमसी पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता ३४.३६ टीएमसी आहे. गेल्या २४ तासात धरण परिसरात ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या वर्षी आत्तापर्यंत धरण परिसरात २८१२ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
Previous Articleसंगोळ्ळी रायण्णा कॉलेजमध्ये इंग्लीश फोरमचे उद्घाटन
Next Article बसपासकडे विद्यार्थ्यांची पाठ








