प्रातांधिकारी अमित माळी यांचे आदेश
प्रतिनिधी/वारणानगर
चांदोली धरण क्षेत्रात पाऊसाचा जोर वाढत राहिल्याने धरणातून वारणा नदीपात्रात सुमारे १५ हजार क्यूसेस प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा काठचा पुराचा धोका वाढला आहे. खबरदारी म्हणून पूरबाधीत क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलातंर करण्याचे आदेश पन्हाळा विभागाचे प्रातांधिकारी अमित माळी यानी दिले आहेत.
चांदोली ता. शिराळा येथील वसंत सागर या वारणा धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे आज (दि. १६) सकाळी १० वाजता ११५९९ क्युसेक्स सांडव्यावरुन ,पॉवर हाउस येथून १३८५ असा एकूण १२९९४ क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत होता. तो वाढवून १३१०१ सांडव्यावरुन व पॉवर हाउस येथून १३८५ असा एकूण १४३९५ इतका विसर्ग वारणा नदीपात्रात सोडणेत येत असल्याचे तसेच धरणात पाणी साठा ३१.०१ टी. एम.सी होऊन धरण ९०.१४ टक्के भरल्याचे वारणा पाटबंधारे वारणावती शाखेचे शाखाधिकारी टी.एस.धामणकर यानी सांगीतले.
चांदोली धरणातून विसर्ग वाढवल्याने वारणा नदीपात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे वारणा नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ यांनी सतर्क राहावे व ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलातंरीत करावे असे आदेश प्रातांधिकारी माळी यानी दिले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









