रहिवाशांची मागणी: मनपावर मोर्चा : महापौरांना निवेदन
प्रतिनिधी / कुपवाड
कुपवाडच्या प्रभाग समिती तीन अंतर्गत येणाऱ्या वारणाली (विद्यानगर) भागाल जिजामाता गृहनिर्माण सोसायटीच्या रहिवासी क्षेत्रावर मनपाने टाकलेले उद्यान आणि क्रीडांगणाचे आरक्षण तातडीने हटविण्यात यावे. याबाबतचा ठराव मनपाने संमत करावा, अशी आग्रही मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
या मागणीसाठी मंगळवारी सोसायटी परिसरातील नागरिकांनी पहिल्यांदा प्रभागाचे नगरसेवक विष्णु माने, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, सोनाली सागरे यांच्याकड़े तक्रारी केल्या. यावेळी येथील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तरीही नागरिकांनी सांगली मनपा कार्यालयावर मोर्चा काढून महापौरांना लेखी निवेदन दिले. यावेळी महापौरांना निवेदन देताना नगरसेवक विष्णु माने, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, सोनाली सागरे, सोसायटीचे अध्यक्ष विशाल मोरे, सचिव अजय पवार, उपाध्यक्ष जयश्री पाटील, महेश सागरे, संचालक गणपती मगदूम, रामचंद्र साळुंखे, महेश पाटील यांसह नागरिक उपस्थित होते.








