वारणानगर / प्रतिनिधी
वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंग्लीश अकॅडमीच्या कार्यालयात असलेली तिजोरी फोडून अज्ञात चोरटयानी रोख ६५ हजार रुपयावर डल्ला मारला या शाळेजवळच असलेल्या वारणा विद्यालयात चोरीचा डाव फसला. अॅकॅडमीच्या प्राचार्य हेलीना मोनीस यानी कोडोली पोलीसात फिर्याद नोंदवली आहे.
वारणानगर ता. पन्हाळा येथील सतत रहदारी असलेल्या वाठार – बोरपाडळे राज्यमार्गाला लागूनच या दोन्ही शाळा आहेस शनिवार दि. २ रोजी रात्री उशीरा अॅकॅडमीला लागून जवळ असलेल्या वारणा विद्यालय या शाळेच्या कार्यालयाचे कडी कोंयडा उचकटून चोरी करणेचा प्रयत्न केला परंतु या शाळेत चोरट्याच्या हाती काहीच सापडले नाही.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी,वारणानगर येथे राज्य मार्गा शेजारी मोठया प्रमाणावर वर्दळ असलेल्या मार्गावर तात्यासाहेब कोरे इंग्लिश अकॅडमी व श्री वारणा विद्यालय ही मराठी माधमाची अशा दोन शाळा आहेत. शनिवारी रात्री तात्यासाहेब कोरे अकॅडमी शाळेचा मुख्य प्रवेशद्वाराचे कुलुप उचकटून व कडी कोयंडा तोडून शाळेचे मुख्य कार्यालय, प्राचार्य कार्यालय व रेकॉर्ड रूमचे कुलुप उचकटून लोखंडी कपाटांचे लॉक तोडून व लॉकर उचकटून त्यामध्ये विद्यार्थाच्याकडून प्रवेशासाठी जमा झालेली फी रूपये ६५ हजार वर डल्ला मारला.
शनिवारी शाळेचे कामकाज संपल्यानंतर शाळेचे प्राचार्य ,अधिकारी व कर्मचारी वर्ग कुलूप लावून गेले होते. रविवारी सकाळी शिपाई शाळेत येताच त्याला दरवाजाचे कुलुप कोणीतरी तोडले असल्याचे दिसून आले. त्याने तात्काळ याबाबतची माहिती प्राचार्य यांना सांगितली. प्राचार्याना कोणीतरी सर्व दरवाज तोडलेचे दिसून आल्याने त्यांनी याबाबतची खबर कोडोली पोलिसाना दिली. पोलिसांनी रविवारी चोरीचा सुगावा लागणे करीता श्वानपथक मागविले होते. शाळेच्या पुढे असलेल्या राज्य मार्गापर्यतच श्वान जावून थांबले त्यामुळे चोरटे पुढे कोठे गेले यांचा सुगाव लागू शकला नाही. चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर आवाहन निर्माण झाले आहे.
तसेच या शाळेच्या शेजारीच असलेल्या मराठी माध्यमाची श्री वारणा विद्यालयात ही चोरट्याना मोर्चा वळविला होता पंरतु त्यांना या शाळेत काहीच सापडले नाही अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशीद करीत आहेत.
Previous Articleम्हैसाळ रस्त्यावर डंपरच्या धडकेत डॉक्टर ठार
Next Article अर्जूनवीर राहुल आवारे अडकला विवाह बंधनात









