पथनाटय़ाद्वारे केली वायू प्रदूषणाबाबत जागृती : आरटीओ कार्यालयाचा पुढाकार : बेंगळूरच्या पथकाचे पथनाटय़
प्रतिनिधी /बेळगाव
प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारही प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता ‘वायू प्रदूषण थांबवूया आणि पर्यावरण वाचवूया’ या अंतर्गत आरटीओ विभागाकडून कार्यक्रम राबविण्यात आला. कर्नाटक सरकार वाहतूक विभागाद्वारे पर्यावरण व ई-प्रशासनअंतर्गत संपूर्ण राज्यात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सोमवारी सकाळी आरटीओ कार्यालय परिसरात पथनाटय़ाद्वारे जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला ज्ये÷ वाहन निरीक्षक आय. एस. रामण्णावर, शिवानंद केसरी, कचेरी अधिकारी शरण्णाप्पा हुग्गी, शीतल कुलकर्णी, विभागीय नियंत्रणाधिकारी पी. वाय. नायक, विभागीय संचार अधिकारी के. के. लमाणी, कामगार कल्याण अधिकारी सत्यनारायण, जनजागृती अधिकारी बी. डी. गुरीकार, साहाय्यक अधिकारी विजय लंगोटी, विभागीय तांत्रिक अधिकारी व्ही. राधाकृष्ण, साहाय्यक प्रशासकीय अधिकारी डी. आर. हिरेमठ, सुमीतकुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारच्यावतीने वायू प्रदूषणाबाबत अनेक उपाययोजना राबविल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात त्या सत्यात उतरतात असे नाही. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. बेळगाव आरटीओ कार्यालयामार्फत प्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासाठी कोणते उपाय करावेत यावर मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी बेंगळूरवरून एक पथक बेळगावात दाखल झाले होते. त्यांनी याबाबत मार्गदर्शन केले.
प्रदूषणातून मुक्तता मिळण्यासाठी त्उपाययोजना राबविणे गरजेचे असून याबाबत पथनाटय़ाद्वारे आरटीओ कार्यालय चौक परिसरात जनजागृती करण्यात आली. यासाठी बेंगळूरवरून आलेल्या पथनाटय़ातील कलाकारांनी खास कार्यक्रम आयोजित केला होता. जनजागृती करून अनेकांना वाहनांद्वारे कशाप्रकारे प्रदूषण होते याची माहिती दिली. हुग्गी यांनी आभार मानले.
वाढत्या वाहनांची संख्या चिंताजनक
वाहनांमुळे पर्यावरणाचा होणारा ऱहास, प्रत्येकाने प्रदूषणाबाबत जागरुकता करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुलांना वायू प्रदूषणाबाबत मार्गदर्शन करणे, वाढत्या वाहनांची संख्याही चिंताजनक बनत आहे. वाहनांतील विषारी धुरामुळे वातावरणात होणारे प्रदूषण, वायू प्रदूषणाबाबत पाठय़पुस्तकात याबद्दलची माहिती देणे, कमी वाहने कशाप्रकारे सुरक्षित, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर पर्यावरणपूरक आहे, यासह इतर माहिती या पथनाटय़ाद्वारे देण्यात आली.









