देवबाग / प्रतिनिधी:
वायरी भूतनाथ, उभाटकर वाडी येथील ट्रान्सफॉर्मरची अज्ञाता कडून तोडफोड करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यामुळे गावात वातावरण काहीसे तंग झाले होते. उभाटकर वाडी येथील ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते.
तोक्ते चक्री वादळा नंतर ठिकठिकाणी विजेचे खांब तुटून पडले आहेत. वायरी उभाटकर वाडी येथे युवकांच्या अथक प्रयत्नानंतर आठवडाभराने शनिवारी वीज पुरवता सुरळीत करण्यासाठी यश आले होते. परंतु येथील वीज ट्रान्सफॉर्मरची रात्रीच्या अंधारात अज्ञाता कडून तोडफोड करण्यात आली. या कृत्याचा ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच याबाबत तक्रार करण्याचा ही निर्णय घेण्यात आला.









