ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशांतर्गत बाजारपेठेत आज सोने आणि चांदीच्या वायदे दरात घसरण झाली. एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा प्रति 10 ग्रॅम 48076 रुपयांवर गेला. मागील सत्रात सोन्याने दर 400 रुपये घसरले होते. तर चांदीचे दर 0.4 टक्क्यांनी घसरून 68,000 रुपये प्रति किलो झाले होते.
जागतिक बाजारातील स्थिती
आज जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर स्थिर होते. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये वाढ झाल्याने जागतिक आर्थिक सुधारणेचे नुकसान होऊ शकते. आज सोने 1 टक्क्यांनी घसरून 1812.83 डॉलर प्रति औंस झाले. चांदी 0.6 टक्क्यांनी घसरून 25.50 डॉलर प्रति औंस झाली. तर प्लॅटिनम 0.2 टक्क्यांनी घसरून 1100.55 डॉलरवर आली.









