ऑनलाईन टीम / मुंबई :
जागतिक बाजारात दर घटल्याने आणि भारतीय रुपया वधारल्याने वायदे बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची घट झाली.आज सोने प्रति दहा ग्रॅम 47,235 रुपयांवरून 45,735 रुपयांवर पोहचले आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट असताना मागील काही दिवसात गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून वायदे बाजारात सोने खरेदीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे मागील काही दिवस सोन्याच्या दरात वाढ होत होती. आज जागतिक बाजारात दर घटल्याने आणि रुपया वधारल्याने सोन्याचे दर पंधराशे रुपयांनी पडले.









