ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील व्यापार सत्रात झालेल्या घसरणीनंतर आज देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचा वायदा वाढला. एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा 0.33 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 47,112 रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा वायदा 1.0 टक्क्यांनी वाढून 68,330 रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रात सोन्याचा वायदा प्रति 10 ग्रॅम 1500 रुपयांनी तर चांदीचा वायदा 3800 रुपये प्रति किलोने घसरला होता.
जागतिक बाजारातील स्थिती
जागतिक बाजारपेठेत स्पॉट गोल्ड 0.6 टक्क्यांनी वाढून 1784.16 डॉलर प्रति औंस झाले आहे. या आठवड्यात स्पॉट गोल्डमध्ये 5 टक्क्यांनी घट झाली आहे. चांदी 1.1 टक्क्यांनी वाढून 26.12 डॉलर प्रति औंस झाली. या आठवड्यात चांदी 6 टक्क्यांनी घसरली.









