ऑनलाईन टीम / मुंबई :
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वायदे बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरीसाठी असलेले सोने प्रति 10 ग्रॅमसाठी 271 रुपयांनी म्हणजेच 0.60 टक्क्यांनी घसरून ते 44,740 रुपये झाले. तर चांदी मे महिन्यातील डिलीव्हरीसाठी प्रतिकिलो 1391 रुपयांनी घसरून 66,136 रुपयांवर ट्रेंड करत होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने 0.3 टक्क्यांनी घसरून 1739.78 डॉलर प्रति औंस झाले, तर चांदीही घसरली.









