पणजी ( प्रतिनिधी ) :
पत्रकार वामन सुभा प्रभू यांना मुंबईतील सारस्वत प्रकाशन या संस्थेतर्फे दिला जाणारा पत्रकार कै गोविंद मंगेश लाड स्मृती पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. छापील तसेच इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेतील वामन प्रभू यांच्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेऊन सारस्वत प्रकाशन संस्थेच्या विश्वस्त मंडळाने त्यांची पत्रकार गो मं लाड यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवषी दिल्या जाणा-या प्रति÷sच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
कोल्हापूर येथे येत्या 9 फेब्रुवारी रोजी सारस्वत प्रकाशनाच्यावतीने सारस्वत चैतन्य गौरव सोहळा-2020 आयोजित करण्यात आला असून याच सोहळय़ात महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते हा पुरस्कार वामन प्रभू याना प्रदान केला जाईल. सारस्वत प्रकाशनचा हा विसावा वार्षिक गौरव सोहळा असून सारस्वत चैतन्य त्रैमासिक उपक्रमही ही संस्था अविरतपणे चालवित .
दैनिक गोमंतकमध्ये उपसंपादक ते गोवादूतचे संपादक असा वामन प्रभू यांचा पत्रकारितेतील प्रवास असून दरम्यानच्या काळात केसरी, लोकसत्ता ,पुढारी या दैनिकासाठीही त्यानी वेगवेगळय़ा पदांवर संपादकीय जबाबदारी साभाळली आहे. गोवा न्यूजलायन या गोव्यातील पहिल्या वृत्तवाहिनीचे ते संस्थापक संपादक आहेत. गोवा जैन टीव्हीचे संपादक म्हणूनही त्यानी जबाबदारी सांभाळली आहे