प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर परिसरात शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडवली. तसेच काही ठिकाणी झाडे पडल्याने नुकसान झाले. सलग तीन दिवस संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस पडत पडल्याने मे महिन्यात संगमेश्वरवाशीय पावसाचा अनुभव घेत आहेत. संध्याकाळच्या दरम्यान येणारा पाऊस अनेकांची धावपळ उडवत आहे.