सावर्डे /प्रतिनिधी
सावर्डे ता. हातकणंगले येथील परीसरात गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेती व पडझड झालेल्या घरांची पाहणी आमदार राजू आवळे यांनी दुपारी केली. यावेळी त्यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी कृषी शास्त्रज्ञ डॉ अशोक पिसाळ, डॉ.दिपक पाटगावकर प्राध्यापक दीपक पाटील गोरखनाथ गोरे, संतोष पाटील, महादेव जाधव, चंद्रशेखर भाई, सुधीर सोळांकूटे, रोहित कुरणे, वडगांव मंडल आधिकारी गणेश बर्गे आदींनी पाहणी केली.
यावेळी बोलताना आमदार राजू आवळे यांनी रविवारी दुपारी वादळी वारा व गारपिटीने झालेल्या शेतकऱ्यांचे व घरांचे नुकसानीची भरपाई मिळावी याकरिता शासनाकडे पाठ पुरावा करणार असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी भाजीपाला या पिकासाठी पुर्ण भरपाई व ऊस व इतर पिकांसाठी अंशतः भरपाई मिळू शकते असे मत व्यक्त केले. सावर्डे व लाटवडे येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस, भाजीपाला फळबागा याची रविवारी दुपारी झालेल्या वादळी व गारपीट पावसाने ऊसशेतीचे,भाजीपाला पिकाचे,फळबागेचे,घरांचे,शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यावेळी कृषी तज्ञाकडून माहिती गतवर्षी अतिवृष्टीने शेती,घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सद्यपरिस्थितीत कोरोनाच्या संकटाने भाजीपाला शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.आता गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महापुराच्या धर्तीवर तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यां ी व ग्रामस्थांनी आमदार राजू आवळे यांच्याकडे केली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी आर.एम. चौगुले, सावर्डे तलाठी माळी मॅडम, बबन पाटील, चेतन चव्हाण, पोलीस पाटील युवराज वडर, कोतवाल सचिन देसाई आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous Articleनिसर्ग चक्रीवादळ : मुंबईवरील धोका झाला कमी
Next Article आठ दिवसात बिले जमा करा अन्यथा अंदोलन करू








