प्रतिनिधी/ लांजा
गुरूवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार वादळी पावसाने लांजा तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले. घरांचे पत्रे उडून तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले. खेरवसे-बौद्धवाडीतील एका घराचे पत्रे फुटून मोठे नुकसान झाले आहे.
गुरूवारी मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने तालुक्यात सर्वांचीच धावपळ उडाली. पाऊस तासभर पडत होता. वादळी पाऊस असल्याने रात्रभर वीज गायब झाली होती. खेरवसे येथे अनंत सखाराम कांबळे यांच्या नवीन बांधलेल्या घराचे 6 पत्रे वादळाने उडून फुटले. यामध्ये त्यांच्या घराचे एकूण 10 हजार नुकसान झाले आहे. तर लांजा, पालू, वेरवली, वाडगाव, कोचरी, आसगे अशा अनेक गावांमध्ये झाडे पडून न्gढकसान झाले आहे. पंधरा दिवसापूर्वी पावसाचा फटका बसला होता. गुरूवारीही तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतकऱयांना नुकसानीला समोर जावे लागले. गुरूवारी तालुक्यात पावसाने विविध गावांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या असून नुकसानीचा पंचनामा ग्रामसेवक करत आहेत.









