आमदार प्रवीण झांट्येंनी केला मतदारसंघाचा दौरा. सभापती राजेश पाटणेकरांची वीज कार्यालयात ठाण. पडझडीची पाहणी. पाण्यासाठीही धडपड. वीज कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे अविश्रांत कार्य कौतुकास्पद.

रविराज च्यारी/डिचोली
सध्या कोरोनाच्या वादळाने लोकांना एकमेकांपासून दुरावले असले तरी रविवारी राज्यात आलेल्या तौक्ते वादळाच्या स्वरूपात अनेकांना घरातून बाहेर येत एकमेकांना हात देण्यासही भाग पाडले. धो धो.कोसळणाऱया आणि सोसाटय़ाच्या वाऱयामुळे संपूर्ण वातावरण भयाण बनले असले तरी काही ठिकाणी घरांवर पडलेल्या झाडांनी घरांबरोबरच काही संसार उध्वस्त केले. मात्र या लोकांना निवाऱयासाठी शेजाऱयांचाच आधार घ्यावा लागला. डिचोली तालुक्मयात या वादळाने लोकांच्या सर्वच मुलभूत गरजा ठप्प करून ठेवल्या. वादळ शमल्यानंतर मात्र डिचोली आणि मये मतदारसंघात आमदारांनी “ऑन डय़?टी” राहत लोकांना सेवा लवकर पुरविण्यासाठी धडपड केली. या सर्व वादळात वीज कर्मचारी आणि अग्निशामक दलाने निभावलेली आपली जबाबदारी मात्र कौतुकास्पदच म्हणावी लागणार.
तौक्ते वादळाने काही काळासाठी कोरोनाला विसरून जाण्यास अनेकांना भाग पाडले. मात्र वादळ आणि पाऊस थंड झाल्यानंतर मात्र लोकांना घरातील अंधाराने वेडेपिसे बनविले. वीज नसल्याने पाण्याच्या पुरवठय़ावर झालेला परिणाम घराघरांमध्ये दिसून येत होता. तरीही संपूर्ण राज्यातच हिच परिस्थिती असल्याने लोकंनीही संयम पाळला. मात्र या संयमाचा बांध तुटण्यापर्यंत तरी लोकांचा अंत पाहू नये, या तत्वावर वीज, जल पुरवठा खाते, अग्निशामक दल आपल्या जिवाचे रान करून झटताना दिसून येत होते.
सर्वत्र वीज वाहिन्यांवर पडलेल्या झाडांमुळे वीजेचे खांब जमिनदोस्त झाले होते. तुटले होते. जोपर्यंत अग्निशामक दल सदर झाडे हटवून विद्यूत वाहिन्यांचा मार्ग मोकळा करीत नाही तोवर वीज खात्याच्या कामाला गती मिळत नाही, असेच समिकरण सर्वत्र होते. अग्निशामक दलावर वीजेचे काम अवलंबून होते. त्यातच अनेक घरांवर पडलेल्या झाडांमुळे घरांची परिस्थिती बिकट झालेली. अशावेळी कुठे प्राधान्य द्यावे याचा विचार.न करता डिचोली अग्निशामक दलाचे जवान तहान भुक विसरून भर पावसातच कामाला लागले. राज्यात सर्वत्रच हिच परिस्थिती असल्याने इतर तालुक्मयातील अग्निशामक दलाला पाचारण करण्याची संधीच नव्हती. या परिस्थितीत समोर आलेले आव्हान स्विकारत डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी लोकांच्या घरांवरील, रस्त्यांवरील आणि वीज वाहिन्यांवरील झाडे हटवून प्राथमिक स्थरावर बचावकार्य केले.
उप वीज वाहिन्यांबरोबरच मुख्य वीज वाहिन्यांवर पडलेल्या झाडे पडल्याने वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली होती. ती जाग्यावर आणण्याचे मोठे आव्हान वीज खात्यासमोर आणि वीज कर्मचाऱयांसमोरही होते. त्यांनीही भर पावसात लोक अंधारात जास्त काळ राहू नये याची काळजी घेत कामाला प्रारंभ केला. सर्व.गोष्टी जाग्यावर घालून वीज पुरवठा सुरळीत करण्यात काही तासांचा आणि दिवसांचा विलंब लागला खरा, पण वादळाने उध्वस्त केलेली संपूर्ण व्यवस्ताच जाग्यावर आणण्यासाठी त्यांनाही बरेच कष्ट घ्यावे लागले, हेही खरे.
अनेक घरांवर झाडे पडून लोकांचे संसार उघडय़ावर पडले. अनेकांच्या घरांची कौले झाडांमुळे फुटून गेल्याने घरातील सर्व सामानांवर पाणी पडले. सर्व जमिनी पाण्याने भरल्या ओल्याचिंब झाल्या. त्यातच जोरदार वाऱयामुळे अधिकच भिती निर्माण केलेली. शिरगावात घाटवळ यांच्या घरावर भलामोठा वटवृक्ष उन्मळून पडल्याने त्यांचे घर उध्वस्तच झाले. तर घरातील दोन महिला जखमीही झाल्या. घरात राहण्याची परिस्थिती नसल्याने मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी जलदगती सेवा देताना त्यांना सरकारी निवारागृहात ठेवले. अशीही प्रकरणे जलदगतीने सोडवून हातावेगळी करण्याचे आव्हान अग्निशामक दलासमोर होते. दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी या आव्हानाला सामोरे जाताना बचावकार्य केले. त्यांना सर्व ठिकाणी स्थानिक लोकांचघही बरीच मदत मिळाली.
वादळानंतर सर्व व्यवस्था जाग्यावर घालण्यची जशी जबाबदारी वीज, पाणी पुरवठा, अग्निशामक दालची होती तितकीच ती जाग्याशर लवकर घालून घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचीही होती. म्हणूनच सभापती तथा डिचोलीचे आमदार वीज पुरवठा डिचोली मतदारसंघात लवकर सुरळीत व्हावा यासाठी रात्रीच्या वेळीच वीज उपकेंद्रात ठाण मांडून होते. डिचोलीच्या काही नगरसेवकांना बरोबर घेऊन सभापती पाटणेकर यांनी वीज कार्यालयास भेट दिली. त्यावेळी सर्व.अधिकारी कर्मचारी कामावल व्यस्त असले तरी त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून वीज पुरवठा लवकर सुरळीत करण्याची सुचना केली.
तसेच डिचोली मतदारसंघात विविध भागांमध्ये झाडे पडून नुकसान झालेल्या ठिकाणी जाऊन सभापती पाटणेकर यांनी प्रत्यक्षात पाहणी केली. आणि या नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर सरकारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच वीजेनंतर बंद असलेल्या पाणी पुरवठयासाठीही त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाशी चर्चा करून डिचोलीसह मये मतदारसंघातही पाण्याचा पुरवठा लवकर व्हावा यासाठी प्रयत्न केले.
मये मतदारसंघाचे आमदार प्रवीण झांटय़? यांनी मये मतदारसंघाचा दौरा करीत संपूर्ण वादळानंतरच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. चोडण गावात मोठय़ा प्रमाणात झाडै पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. डिचोली अग्निशामक दलासमवेत त्यांनी चोडण गावातील झाडे हटविण्याच्या कामात आपली उपस्थिती लावून सुचना केल्या. चोडण येथील काही रस्त्यांवर पडलेली झाडे हटविण्याच्या कामात स्थानिक युवकांनी बऱयाच अंशी काम केले. स्वतः श्रमदान करून या स्थानिक युवकांनी भर पावसातही रस्त्यांवरील लहान मोठी झाडे हटविण्याचे काम केले. त्याची मदत अग्निशामक दलालाही चांगलीच झाली.
आमदार प्रवीण झांटय़? यांनी मये मतदारसंघातील बहुतेक पंचात्रत क्षेत्रांना भेट देऊन बचावकार्याचा अंदाज घेतला. मतदारसंघात पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी त्यांनी संबंधित खात्यांचे अधिकारी आणि इतरांशी संपर्क साधला. नुकसानग्रस्त घरांची पाहणी करताना नुकसानग्रस्तांना तत्काळ सरकारी मदत मिळावी यासाठी त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन लोकांना दिले.
मंगळवारी बहुतेक भागांमध्ये वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला होता. मात्र वीजेचा लपंडाव चालूच होता. तसेच पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर नळांना सर्वप्रथम गढूळ पाणी येत होते. त्यानंतर पाणी शुद्ध येण्यास प्रारंभ झाला. वीजेचा मात्र लपंडाव सुरूच होता. तर काही भाग अद्यापही अंधारातच असल्याचे ऐकायला मिळत आहेत.









