बिग बॉसमधील स्पर्धक , 3 महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण
बिग बॉसचे सर्वात वादग्रस्त स्पर्धक म्हणून प्रसिद्ध राहिलेले स्वामी ओम यांचे निधन झाले आहे. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. स्वामी ओम यांनी बिग बॉसच्या 10 व्या आवृत्तीत भाग घेतला होता.
63 वर्षीय स्वामी ओम यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका बसला होता. मागील 15 दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळत होती. त्यांच्यावर दिल्लीत बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
वादग्रस्त जीवन वादग्रस्त स्वयंभू बाबा स्वामी ओम यांचे जीवन वादांनी भरलेले राहिले. 4 वर्षांपूर्वी त्यांच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दुकानातील सायकली आणि काही दस्तऐवज चोरल्याचा त्यांच्यावर आरोप होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्जही भरला होता. स्वतःच्या बालिश आणि अश्लील बडबडीतून स्वामी ओम यांनी बिग बॉसमधील अन्य सदस्यांचे जगणं अवघड केलं होतं.









