प्रतिनिधी / सातारा :
वाढीव वीज बिलाविरोधात बहुजन मुक्ती पार्टीने एल्गार करत जिल्हा प्रशासनाला कंदील भेट देत अनोखे आंदोलन केले.
सामान्य नागरिक या महागाईत मेटाकुटीस आला असून, त्यात हे वाढीव वीजबिल लोकांनी भरायचे कुठून?, महावितरणकडून लोकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. यावर राज्य शासनाने त्वरित लक्ष घालून वीज तोडणी थांबवावी. तसेच वीज बिल भरण्यासाठी नागरिकांना मुदत द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.









