प्रतिनिधी,कोल्हापूर
भुविकास बँकेतून 2014 पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती तानाजी नलवडे यांनी केले.
वाढीव पेन्शनबाबत मार्गदर्शन करण्यासाठी भुविकास बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्त न्यायमुर्ती नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वाढीव पेन्शनसाठी ऑनलाईन लिंक आलेली आहे. काही कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. पण यामध्ये चुकीची माहिती भरलेली आहे. तर काही कर्मचाऱ्यांनी गैरसमजातून अथवा लिंक ओपन होत नसल्याने अर्ज केलेला नाही. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हि बैठक आयोजित केली होती.
यामध्ये सेवानिवृत्त न्यायमुर्ती यांनी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 मार्चपर्यंत मुदत असून मुदतीपुर्वी अर्ज भरावेत, असे आवाहन केले.यावेळी कर्मचारी राज्य महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय साळोखे, एच. एन. पाटील, व्ही. वाय. कुलकर्णी, बी. एस. हनगंडे, किरण कारवे, बंडोपंत आळवेकर आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









