मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे खंदे समर्थक आणि अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. महत्त्वाचं म्हणजे आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. मधुकर ठाकूर यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोनच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या मधुकर ठाकूर यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपदही भूषवले. याशिवाय त्यांना प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही काँग्रेसने गौरवले होते.
मधुकर ठाकूर यांनी झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिथून त्यांनी जिल्हा परिषद आणि मग 2004 ते 2009 या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार झाले. मधुकर ठाकुर यांनी 2004 मध्ये शेकापच्या तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता. अलिबागमध्ये तब्बल 32 वर्षांनी शेकापचा पराभव झाला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








