रत्नागिरी 40, पोफळी, खेड 5, गुहागर बस तिकिटात 10 रुपयांनी वाढ
चिपळूण
इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ; त्यातच टायर दुरुस्ती पार्टमध्येदेखील वाढ होत असल्याने एस.टी. महामंडळाने 17 टक्के बस तिकीट दरात वाढ केली आहे. यामुळे रत्नागिरी- 40 रुपये, खेड- 5 रुपये, तर गुहागरच्या बस तिकिटात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. वाढत्या दरामुळे प्रवाशांच्या खिशाला अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे.
सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेल्या एसटीचा गाव तेथे प्रवास आणि प्रवासी तेथे एस.टी. असेच वर्षानुवर्षाचे समिकरण झाले आहे. तसे पाहिल्यास चिपळूण बसस्थानकाचा हा बहुतांशी ग्रामीण, कामगार असा सर्वाधिक प्रवासी असून त्यांच्या सोईनुसार आगाराकडून नियोजित फेऱया सुरु केल्या आहेत. असे असतानाच दिवसेंदिवस इंधनाच्या दरात भरसाठ वाढ होत असताना अशातच खासगी वाहनाच्या स्पर्धेत एसटी प्रवासी संख्या कासव गतीने वाढत आहे. त्यामुळे त्याचा आर्थिक बोजा एस.टी. महामंडळाला सहन करावा लागत आहे. या सर्व कारणास्तव महामंडळाने 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एस.टी. तिकीट दरात वाढ केली आहे.
नव्या तिकीट दरानुसार 5 रुपयापासून ते अगदी 80 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तसे पाहिल्यास बहुतांशी ग्रामीण फेऱयाप्रमाणे आगारातून खेड मार्गावर 24 रूपये, रत्नागिरी मार्गावर 12 रूपये, पोफळी मार्गावर 36 रूपये, गुहागर मार्गावर 30 रूपये अशी वाढ करण्यात आली आहे. या फेऱया मिळून तब्बल 200 फेऱया दिवसाला धावत आहेत. एकीकडे भरमसाठ वाढणाऱया महागाईत सर्वसामान्य माणूस भरडला जात असताना त्यातच आता एसटीच्या तिकीट दरात वाढ झाल्याने पुन्हा एकदा आर्थिक भार सोसावा लागणार आहे. तसेच रत्नागिरी बसचा 120 रुपयावरुन 140 रुपये, खेड 55 रुपयावरुन 60 रुपये, गुहागर 60 रुपयावरुन 70 रुपये, तर पोफळी 25 रुपयावरुन 30 रुपये तिकीट दर झाला आहे.
तसेच चिपळूण-मुंबई साध्या बसचा तिकीट दर 335वरुन 395 रुपये, सेमी व स्लिपर बसचा 455वरुन 535 रुपये, शिवशाहीचा 500 वरुन 595 रुपये, चिपळूण-बोरिवली बसचा तिकीट दर साधीचा 360 वरुन 420 रुपये, सेमी व स्लिपरचा 485 वरुन 570 रुपये, शिवशाहीचा 530 वरुन 620 रुपये, चिपळूण-ठाणे बसचा साधीचा 330 रुपयावरुन 385 रुपये, सेमी व स्लिपरचा 445 वरुन 520 रुपये, चिपळूण-बदलापूर साधीचा 360 वरुन 410 रुपये, सेमी व स्लिपरचा 485 वरुन 570 रुपये, शिवशाहीचा 530 वरुन 620 रुपये, चिपळूण-पुणे स्टेशन साधीचा 315 वरुन 565 रुपये, सेमी व स्लिपरचा 425 वरुन 500 रुपये, शिवशाहीचा 465 वरुन 545 रुपये, चिपळूण-चिंचवड साधीचा 330 वरुन 38ग्न5 रुपये, सेमी व स्लिपर 445 वरुन 520 रुपये, शिवशाहीचा 485 वरुन 570 रुपये, चिपळूण-कोल्हापूर साधी 225 वरुन 260 रुपये, सेमी व स्लिपर 305 वरुन 355 रुपये, शिवशाही 330 वरुन 390 रुपये, चिपळूण-मिरज साधी 245 वरुन 290 रुपये, सेमी व स्लिपर 335 व्रुन 390 रुपये, शिवशाही 365वरुन 430 रुपये, चिपळूण-अक्कलकोट साधी 485 वरुन 665 रुपये, सेमी व स्लिपर 660 वरुन 770 रुपये, शिवशाही 720 वरुन 840 रुपये, गोवळकोट-मिरज साधी 255 वरुन 295 रुपये, सेमी व स्लिपरचा 345 वरुन 405 रुपये, शिवशाही 375 वरुन 440 रुपये, कासे-पेंढाबे-बोरिवली साधीचा 435 वरुन 505 रुपये, सेमी व स्लिपर 485 वरुन 690 रुपये, शिवशाही 640 वरुन 750 रुपये असा तिकीट दर झाला आहे.
या भरमसाठ तिकीट दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.









