सत्तरीतील रुग्णांची संख्या 20 : मोर्ले घोडेमळ कंटनमेट झोन जाहीर
वाळपई / प्रतिनिधी
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सत्तरी तालुक्मयाची परिस्थिती गंभीर बनण्याची शक्मयता निर्माण झालेली आहे. कालपर्यंत सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये एकूण 14 रुग्णांची नोंद झाली होती. यात आज सहा रुग्णांची भय पडल्यामुळे सत्तरी तालुक्मयात आता रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. यामध्ये मोर्ले पंचायत क्षेत्रातील घोडेमळ भागाचा प्रामुख्याने समावेश आहे. यावाडय़ावर एकूण रुग्णांची संख्या 15 झाली आहे . दरम्यान आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घोडेमळ वाडय़ावर कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर सरकारने सदर भाग कंटेनमेंट झोन जाहीर केलेला आहे. त्याच प्रमाणे देऊळवाडा व कासारवाडा या दोन्ही परिसरात बफर झोन जाहीर करण्यात आलेले आहेत. यामुळे शनिवारपासून सदर वाडय़ावर मोठय़ा प्रमाणात निर्बंध लागण्याची शक्मयता आहे.
यासंदर्भाची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयात रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सत्तरी तालुक्मयातील मलपण 2 शिरोली 2 गुळेली 1 व मोर्लै घोडेमळ वाडय़ावर एकूण 15 रुग्णांची नोंद झालेली आहे .यामुळे भागात खळबळ निर्माण झाली असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सत्तरी तालुक्मयात भयग्रस्त वातावरण निर्माण झालेले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची कटंनमेट झोन जाहीर करण्याची मागणी.
राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गुरुवारी सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये भेट देऊन नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला .नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन यारोगाचा संसर्ग आपल्यापर्यंत पोहोचणार नाही यासाठी विशेष दखल घेण्याची विनंती त्यांनी नागरिकांनी केली आहे. मात्र आज शुक्रवारी मोर्ले भागामध्ये आणखी 5 रुग्णांची भर पडल्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱयांची घोडेमळ हा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची करण्यात आलेली मागणी सरकारने मान्य केली असून संध्याकाळी उशिरा संदर्भात कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात निर्बंध लागण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. सदर भागात इतर नागरिकांना प्रवेश दिला जाणार नसून या भागातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या भागातील कासारवाडा व देऊळवाडा या दोन्ही वाडय़ावर बफर झोन जाहीर करण्यात आलेला आहे.
मोर्ले पंचायतीकडून मोफत कडधान्य.
दरम्यान मोर्ले पंचायत क्षेत्रांमध्ये कोरोनाचे विषाणू मोठय़ा वाढत असल्यामुळे गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. घोडेमळ याठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सदर भागातील नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे .यामुळे त्यांच्यासमोर कडधान्य विकत आणण्यासाठी समस्या निर्माण होत असल्यामुळे पंचायतीने कडधान्ये उपलब्ध करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पंचायतीतर्फे सदर भागातील 51 कुटुंबांना मोफत कडधान्य वितरित करण्यात आल्याची माहिती पंचायतीच्या सरपंचा विद्या सावंत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
आदेश येताच सिमा बंद करणार.
दरम्यान वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अजून पर्यंत या संदर्भाचा लेखी आदेश प्राप्त झालेला नाही .आदेश येताच मोर्ले येथील घोडेमळवाडा परिसरातील सीमा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे .त्यामुळे बाहेरच्या नागरिकांना सदर वाडय़ावर व सदर वाडय़ावरील नागरिकांना बाहेर पडता येणार नसल्याचे त्यांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
विश्वजीत राणेचा दौरा.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सत्तरी तालुक्मयातील पॉझिटिव्ह रुग्ण संबंधित शिरोली मोर्ले आदी भागामध्ये फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित भागातील सरपंच पंच सामाजिक नागरिक जागरूक नागरिकांना रोगाचा संसर्ग नियंत्रित करण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे आवाहन केले. आता प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून कुणीही खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वां®ााr उल्लंघन होणार असे कृत्य करू नये अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले आहे. यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की सत्तरीतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आरोग्य खात्याची आहे .मात्र प्रत्येक नागरिकांनी आपल्यापरीने सर्वांनी सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले .पॉझिटिव्ह रुग्ण संबंधित परिसरातील नागरिकांची सामूहिक स्थरावर चाचणी करण्यात आलेली आहे असे यावेळी त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.









