सातारा/प्रतिनिधी
कोणत्याही साथीच्या बाबतीत जी गोष्ट घडते, तीच कोरोनाच्या बाबतीत देखील घडत आहे.अधून मधून आकडे कमी होतात, जास्त होतात.परंतु नागरिकांनी अजिबात विचलित होऊ नये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी पत्रकाद्वारे केले आहे. गेले काही दिवसात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे.सार्वजनिक जीवन बहुतांशी चालू झाले आहे. प्रशासन काटेकोर प्रयत्न करीत आहे. सर्व जणांनी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखणे अत्यंत गरजेचे बनले आहे.कोरोना विषाणूचा आपण सर्वजण प्राणपणाने मुकाबला करीत आहोत. तथापि, आता अनेक व्यवहार, अनेक कार्यालये सुरू आहेत. अगदी आयुर्वेदिक ,होमिओपॅथी, युनानी उपायांना सुद्धा मान्यता देण्यात आली आहे. घरगुती काळजी सुद्धा आपण घेऊ शकतो.याबाबत “वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक” अशा तिन्ही पातळीवर काम करणे आणि खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.
संकट पूर्णपणे टळले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. नागरिकांनी स्वतः दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे नम्रपणे नागरिकांना सुचवावेसे वाटते. प्रशासन आपले काम आणि खबरदारी पहिल्या प्रमाणेच घेत आहे. परंतु नागरिकांची साथ मिळाली तर ;आपण लवकरात लवकर यश मिळवू , यात कोणतीही शंका नाही. विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर वेळोवेळी शासन महत्त्वाचे निर्णय घेत आहे.अनेक सामाजिक संस्था; शासकीय संस्था, आयुर्वेद व्यासपीठ सारखे जागरूक मंच प्रयत्न करीत आहेत. “आर्सेनिक अल्बम 30” गोळ्यांचे वाटप व्यापक प्रमाणावर झाले आहे. शासनाने नुकत्याच दिलेल्या निर्देशानुसार सविस्तर नियमावली तयार केली आहे. कार्यालयाला भेट देणारे अभ्यागतांना तसेच कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांना पूर्णवेळ मास्क वापरणे अनिवार्य आहे. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा. वारंवार ज्यांना स्पर्श केला जातो अशा वस्तू तसेच पृष्ठभाग यांची स्वच्छता व्यवस्थित ठेवा केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या सूचनांनुसार वैयक्तिक कौटुंबिक काळजी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक पद्धतीने घ्यावी असे देखील विनंती वजा आवाहन पुढे भागवत यांनी केले आहे.