वारणानगर / प्रतिनिधी
(ता.पन्हाळा) येथील एकजण घरात काहीही न सांगता निघून गेल्याने कुदूंबात अस्वस्थता पसरली आहे. मोहन दिनकर शिंगे (वय ५३) असे त्यांचे नाव आहे.या बाबत मोहनचा मुलगा संदीप शिंगे यांनी कोडोली पोलिसात फिर्याद दिली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मोहन हा शुक्रवार दि.३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घरात कुणालाही न सांगता निघून गेला तो अद्याप परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतले नंतर तो सापडला नसल्याने या बाबतची फिर्याद देण्यात आली. मोहन शिंगे याचे वर्णन असे, अंगाने मध्यम, रंगाने गोरा, उंची ५ फुट ३ इंच, गोल चेहरा, सरळ नाक, काळे डोळे, काळे पांढरे केस, अंगात निळसर दगडी रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट, पायात चप्पल, मराठी बोलतो आशा व्यक्तीचा कोण सापडल्यास कोडोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा आव्हान करण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक परीट व यादव हे करीत आहेत.