वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यातील वाडा भराडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार वाटपात पूर्ण धान्य वाटप केले म्हणून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या स्वाक्षऱया घेऊन पत्यक्षात मात्र कमी धान्य देण्यात आल्याचा पकार उघडकीला आला आहे. याबाबत पालकांनी तकार केल्यानंतर झालेल्या चौकशीत शाळेत 63 किलो धान्यसाठा शिल्लक असल्याचे आढळून आला आहे. त्यामुळे ही शाळा संशयाच्या भोवऱयात सापडली आहे.
राजापूर तालुक्यातील वाडा भराडे पाथमिक शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांना शासनाच्या मान्यतेनुसार दरमहा पोषण आहारचे वितरण चालू आहे. लाŸकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने मुख्याध्यापकांमार्पत विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून धान्य वाटप केले जात आहे. एक-दोन महिन्यात शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना कमी प्रमाणात धान्य मिळत असल्याच्या तकारी होत होत्या. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांना कमी प्रमाणात धान्य देत असताना योग्य प्रमाणात धान्य वाटप केले असे दाखवून पालकांच्या वाटप रजिस्टर वर सह्या घेतल्या आणि ऑनलाईनला तशी नोंद घालून शिल्लक धान्य शून्य दाखविण्यात आले आहे.
हा प्रकार समजल्यावर शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुकाध्यक्ष पिंट्या कोठारकर यांनी पंचायत समिती सभापती पकाश गुरव यांच्याकडे तकार करून चौकशीची मागणी केली. त्यानंतर सभापती गुरव यांनी शाळेत भेट देऊन तपासणी केली. यावेळी 43 लाभार्थी विद्यार्थ्यांना धान्य वाटप करून सुद्धा 63 किलो तांदूळ, 15 किलो मुग आणि 21.50 किलो मसुरडाळ अशा प्रकारे धान्यसाठा शिल्लक असल्याचे आढळून आले. त्यामुळे या पकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती गुरव यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
पोषण आहाराचे पूर्ण वाटप झाले असताना, आŸनलाईनला शिल्लक धान्य दिसत नसताना शाळेत धान्य शिल्लक कसे? असा सवाल उपस्थित केला जात असून या पकरणाची सखोल चौकशी करून कोण दोषी आढळल्यास कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









