मंत्री गोविंद कारजोळ यांची सूचना : पाटबंधारे खात्यातील अधिकार्यांची बैठक
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्याला वाटप झालेल्या पाण्याचा पूर्ण प्रमाणात सदुपयोग व्हावा, यासाठी उपाययोजना करा, अशी सूचना पाटबंधारे मंत्री बसवराज बोमाई यांनी खात्यातील अधिकार्यांना केली आहे. कर्नाटक पाणीपुरवठा निगमची बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतला तसेच अधिकार्यांना विविध सूचना केल्या.
राज्यातील विविध जलाशयांचे पाणी जललवाद किंवा न्यायालयाने राज्याला वाटप केलेल्या पाण्याचा पूर्ण प्रमाणात सदुपयोग करावा. राज्यात 140 लाख हेक्टर प्रदेश विविध व्यवसायांसाठी योग्य आहे. त्यापैकी 29.18 लाख हेक्टर प्रदेशाला पाणीपुरवठा केलेला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पाटबंधारे खात्यासाठी 18,702 कोटी रुपयांची तरतtद करण्यात आलेली आहे. जुलै अखेरपर्यंत 5,053 कोटी रुपये खर्चाची कामे प्रगती पथावर आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पाणीपुरवठा योजनांसाठी भूसंपादन महत्त्वाचे असल्याने भूसंपादन प्रक्रियेला अधिक प्राधान्य द्या. सरकारवर अधिक आर्थिक भार पडणार नाहि, अशा तऱ्हेने पाणी पुरवठा आणि शेतकर्यांना अनुकूल होतील, अशा योजना तयार करा. तलावांमध्ये नद्यांचा पाणीसाठा करण्याची योजना, शेततळे योजना उत्तम असून त्यामुळे पाण्याचा मुबलक साठा होत आहे. शेततळ्यांसाठी उत्तम दर्जाचे प्लास्टिक वापरले जावे. त्यामुळे पाणी जमिनीमध्ये झिरपणार नाहि. परिणामी अधिकाधिक पाण्याचा सदुपयोग होऊ शकतो. हाती घेतलेली कामे उत्तम दर्जाचीच असावीत, असा कानमंत्रहि मंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकार्यांना दिला.









