प्रतिनिधी/ बेळगाव
वाङ्मय चर्चा मंडळातर्फे शनिवारी मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नाटय़गीत, नाटय़ाविष्कार रंगला. व्यासपीठावर वाङ्मय चर्चा मंडळ नाटय़शाखा चिटणीस विठ्ठल याळगी, कार्याध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराजाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन झाले. अश्विनी सरनोबत यांनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते नाटय़ कलाकारांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक नीता कुलकर्णी यांनी केले.
यावेळी सुनील नांगरे व निशीगंधा कानूरकर यांनी नटराज स्तुती नृत्य सादर केले. यानंतर आश्विनी सरनोबत यांचे नाटय़गीत सादर झाले.
यावेळी नीता कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित आगळा-वेगळा छंदनाटय़ रंगला. याला उपस्थितांनी दाद दिली. यामध्ये चिन्मय शेंडे, शिशीर कुलकर्णी, श्रीया देशपांडे, निशा तेंडोलकर, गौरी गजबर, तनीश जोशी, सुदीप बिलावर, श्रेया सव्वाशेरी, अंकिता कदम आदी कलाकारांचा सहभाग होता. याप्रसंगी रसिक नाटय़प्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीया देशपांडे यांनी केले. आभार चिन्मय शेंडे यांनी मानले.









