वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील गोळावली या ठिकाणी चार वाघाचा मृत्यूनंतर तपास यंत्रणेला एकूण वाघाच्या मृत्यू संदर्भात संशयितांना अटक करण्यात यश प्राप्त झाले असलेतरी एका वाघाची गायब झालेले नखे मात्र शोधण्यात आतापर्यंत अपयश आलेले आहे.
त्यामुळे तपास यंत्रणा पूर्णपणे हतबल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दुसऱया बाजूने वेगवेगळे स्तरावरून वनखात्याचे यंत्रणेलाच दोष देण्याचे काम सुरू असल्यामुळे जोपर्यंत यांचा शोध लागत नाही तोपर्यंत वनखात्याची यंत्रणा टार्गेट होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही .
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील गोळावली धनगरवाडा याठिकाणी चार वाघांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर मोठय़ा प्रमाणात खळबळ निर्माण झालेले आहे. आतापर्यंत सदर वाघांचा मृत्यू संदर्भात पाच संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना सात दिवसांचा रिमांड देण्यात आलेला आहे. सदर रिंमाड शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी संपुष्टात येणार असल्यामुळे पुन्हा त्यांना वाळपईच्या प्रथम न्यायदंडाधिकारी समोर हजर करण्यात येणार आहेत. यामुळे त्यांना जामीन प्राप्त होणार का अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झालेला आहेत. दुसऱया बाजूने एका वाघाची सर्व नखे गायब झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचा dरयत्न तपास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येत आहे .मात्र आतापर्यंत त्याला यश प्राप्त झालेला नाही. दुसऱया बाजूने याचार वाघांचा मृत्यू झालेला आहे. त्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करीत असली तरीही दुसऱया बाजूने मात्र
पावणे कुटुंबियाना मोठय़ा प्रकारे पाठिंबा प्राप्त होत असल्याचे पहावयास मिळत आहे. धनगर समाजातील या कुटुंबाने आतापर्यंत अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देत आपला उदरनिर्वाह सांभाळलेली आहे. अशा अवस्थेत त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनणाऱया गाय व म्हशीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त बनलेल्या पावणे कुटुंबियाकडून वाघांचा बळी जाण्याचा प्रकार घडल्याचे आतापर्यंत एकूण तपासणीच्या माध्यमातून समोर आलेले आहे. मात्र अजून पर्यंत वाघाचा मृत्यू निश्चितपणे कशाप्रकारे झाला हे चाचणीच्या माध्यमातून सिद्ध व्हायचे आहे तरीसुद्धा संशयित आरोपी म्हणून पावणे कुटुंबियातील पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे.
दरम्यान एका वाघाची गायब झालेली नखे वेगवेगळय़ा माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र अजून पर्यंत त्यांना यश प्राप्त झालेला नाही. यामुळे याचा तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून सध्यातरी वेगवेगळय़ा स्तरावर तपास यंत्रणेवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर दुसऱया बाजूने वनखात्याची यंत्रणेला दोष देण्याचे प्रकार होऊ लागले असून गुरांचा मृत्यू झाल्यानंतरही ही बाब गंभीरतेने न घेता फक्त आपल्या खात्याअंतर्गत कारवाई करण्यापर्यंत खात्याने काम केलेले आहे .त्यामुळे प्रथमदर्शी सदर कुटूंबाचा दोष याच्यापेक्षा या कुटुंबाला आता सामाजिक स्तरावर बऱयाच प्रमाणात पांठिबा प्राप्त होताना दिसत आहे. जोपर्यंत नखाचा शोध प्राप्त होत नाही तोपर्यंत तपास यंत्रणा समोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी गोळावली येथील अत्यंत जागृत समजल्या जाणाऱया सिद्धेश्वराला गावातील नागरिकांनी साकडे घालून त्यांचा शोध प्राप्त व्हावा यासाठी बळ द्यावे अशा अशाप्रकारची प्रार्थना केल्याचे समजते. कारण सिद्धेश्वराची पारंपारिक भुगत हा कार्यक्रम साजरा करत असतानाच पहिल्या वाघाचा मृत्यू निदर्शनास आला होता. त्यानंतर अन्य तीन वाघांचे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे सिद्धेश्वरामुळेच या वाघांच्या मृत्यूचे प्रकरण उघडकीस आल्याची आता तरी भावीक व नागरिकांची भावना झालेली आहे. यामुळे वनखात्याचे यंत्रणा यांनाही सिद्धेश्वराची शक्ती अवगत झाली असून सिद्धेश्वर यामुळेच वाघाचा मृत्यू उघडकीस आला व त्यांच्यामुळे आता नखाचा शोध लागणार असल्याची त्यांची भावना झाल्याचे समजते.









