प्रतिनिधी / वाळपई :
सत्तरी तालुक्मयातील गोळवली याठिकाणी चार वाघांचा मृत्यू झाल्यामुळे आता वाघांच्या अधिवासांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकेकाळी जंगलात मोठय़ा प्रमाणात वाघ असतानाही सदर वाघांचा अधिवास लोकवस्ती नजीक हा अंशतः प्रमाणात आढळत होता. मात्र गेल्या काही वर्षापासून मानवाचे घनदाट जंगल परिसरामध्ये अतिक्रमण वाढू लागल्यामुळे व मोठय़ा प्रमाणात त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे वाघाने आता लोकवस्ती नजीक जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच माध्यमातून चार वाघांचा दुर्दैवी बळी जाण्याचा प्रकार समोर आलेला आहे. यामुळे येणाऱया काळात मानवाचे अतिक्रमण जंगलांमध्ये कसे रोखणार या संदर्भात उपाययोजना वनखाते त्याचप्रमाणे गोवा सरकारने गांभीर्याने घेतल्यास येणाऱया काळात जैवविविधता संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून योगदान ठरणार आहे.
जंगलात धागडधिंगाणा वाढला
या संदर्भात मिळालेल्या अधिक माहिती दिवसात म्हादई अभयारण्य त्याचप्रमाणे कर्नाटक व महाराष्ट्राच्या नजीक असलेल्या घनदाट जंगलांमध्ये असलेले धबधबे हे सर्वांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मात्र सदर धबधबे आता रानटी जनावरांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर स्वरूपाच्या प्रश्न निर्माण करीत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चौथऱयाच्या ओझर चिखली, बाराजण ओझर शेतीच्या अडय़ाचो ओझर हे धबधबे सध्यातरी पर्यटनासाठी मोठय़ा प्रमाणात भुरळ घालत आहेत. पावसाळय़ानंतर सुद्धा या धबधब्यावर मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची रिघ लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आज सुद्धा बाराजण धबधब्यावर जवळपास दीड हजारांपेक्षा जास्त पर्यटकांचा धिंगाणा सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहेत. यात प्रामुख्याने 200 पेक्षा जास्त परदेशी पर्यटकांचा समावेश होता. कर्कश संगीत व वेगवेगळय़ा माध्यमातून निर्माण होणाऱया धागडधिंगाणा हा सध्यातरी रानटी जनावरांसाठी मोठा धोका निर्माण करीत आहेत.
चोर्लामार्गे वाहतूक वाघांसाठी असुरक्षित
दरम्यान यासंदर्भात पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा कर्नाटक दरम्यान या राज्यांना जोडणारा चोर्ला मार्ग हा सध्यातरी वाघांसाठी पूर्णपणे असुरक्षित बनू लागला आहे. या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक वाढल्यामुळे वाघाना रस्ता ओलांडणे हे धोक्मयाचे बनू लागले आहे. अंजूणे परिसरांमध्ये धरणाची उभारणी करण्यात आल्यानंतर सदर ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. त्याचप्रमाणे अपेक्षित प्रमाणात गवत निर्माण होऊ लागल्यामुळे सदर परिसरात हरण, रानडुक्कर, गवेरेडे यांची संख्या वाढू लागली आहे. सदर रानटी जनावरे ही वाघांची शिकार आहे. मात्र अभयारण्याच्या परिक्षेत्रातून सदर परिसरात जाण्यासाठी रस्ता पार करावा लागतो. मात्र मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या वाहतुकीमुळे वाघांना रस्ता पार करणे शक्मय नसल्याने त्यांच्या समोर निर्माण झालेली समस्या याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता लोकवस्तीच्या दिशेने आपला मोर्चा वळविला आहे. याच अनुषंगाने गोळावली या ठिकाणी चार वाघांचा बळी जाण्याचा प्रकार घडला. महत्त्वाचे म्हणजे या संदर्भात वनखात्याने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते. मात्र गेल्या काही वर्षापासून वाघांची सुरक्षितता त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी खाद्य उपलब्ध करण्यास वनखात्याची यंत्रणा पूर्णपणे निष्काळजी ठरल्यामुळे आज एका दृष्टीने मानवाच्या अतिक्रमण व दुसऱया बाजूने खाद्य उपलब्ध होत नसल्यामुळे वाघाने आता लोकवस्तीच्या नजीक आपला मोर्चा वळविण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशा प्रकारच्या करूण घटना घडू लागल्या आहेत. येणाऱया काळात यागोष्टी थांबवायच्या असेलतर सरकारने वाघाची सुरक्षितता व संवर्धन यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे आहे.









