प्रतिनिधी/ म्हापसा
वझरात वागातोर येथे असलेल्या ज्युली जॉली रेस्टॉरंटच्या रुफला (छप्पराला) आग लागल्याने बरीच धावपळ उडाली. छप्परावरून गेलेल्या वीजेच्या तारांची ठिणगी पडल्यानेच आगीने पेट घेतल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
आग लागल्यावर स्थानिक नागरिक तसेच रेस्टॉरंटच्या कामगार वर्गांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. तोपर्यंत म्हापसा अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचल्यावर त्यांनीही पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज शेटगावकर, योगेश आमोणकर, संजय फडते, प्रकाश घाडी, अर्जुन धावस्कर यांनी आग विझविण्यात यश मिळविले.









