सोनी सबवरील मालिका वागले की दुनिया नयी पीढी नये किस्से रोमांचक ट्विस्ट्ससह वागलेच्या जीवनातील दैनंदिन घटनांना सादर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आगामी एपिसोड्समध्ये महिला वर्गाने गुपचूपणे रिसॉर्टमध्ये नाईट आऊट धमाल करण्याचा बेत आखला आहे.
पतींकडून अविरत होणारे नखरे व मागण्या पाहता महिलांनी आता या गोष्टीला लगाम घालण्याचे ठरवले आहे. स्वतः जबाबदारी घेत वंदना आणि तिच्या मैत्रिणींनी ताजेतवाने होण्यासोबत आराम करण्यासाठी गुपचूपपणे रिसॉर्टमध्ये नाईट आऊट धमाल करण्याचे ठरवले आहे. उत्सुकतेपोटी पुरूषमंडळी त्यांच्या पत्नींवर गुप्तपणे नजर ठेवण्याचा आणि पतींबाबतचे त्यांचे मत जाणून घेण्याचे ठरवतात.
या ट्रकबद्दल बोलताना राजेश वागलेची भूमिका साकारणारे सुमीत राघवन म्हणाले, मालिकेमधील महिलांनी पहिल्यांदाच त्यांच्या पतीशिवाय गुपचूपपणे अशा प्रकारचे काहीतरी नियोजन केले आहे. ज्यामुळे महिलांनी नियोजित केलेल्या सिक्रेट नाईट आऊट धमालबाबत राजेश व इतर पतींची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे रोमांचक असणार आहे. एपिसोड हसवून-हसवून लोटपोट करणार आहे आणि पुढे काय घडते हे जाणून घेण्याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये निर्माण
करेल. वंदना वागलेची भूमिका साकारणाऱया परिवा प्रणती म्हणाल्या, ’मालिकेमधील माझी भूमिका अत्यंत उत्साही आहे, ज्यामुळेच मला ती भूमिका खूप आवडते. पहिल्यांदाच महिलांनी गुप्तपणे काहीतरी करण्याची योजना आखली आहे आणि पतींना याबाबत समजल्यानंतर पुढे काय घडते हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असणार आहे.









