मेंढपाळांच्या नुकसान भरपाईची व संरक्षणाची मल्हार सेनेची मागणी
प्रतिनिधी / वाकरे
वाकरे (ता.करवीर) येथील सरपंच वसंत तोडकर यांच्या शेतामध्ये खुपीरे येथील बिरु सिध्दू हराळे यांची बकरी बसण्यासाठी होती. बकरी दिवसभरामध्ये चरण्यासाठी बाहेर गेली असता तेथे तरस सदृश्य प्राण्याने बकऱ्यांच्या पिलांवर हल्ला करून सुमारे दहा पिल्ली फस्त केली. यामुळे मेंढपाळ बिरु हराळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
याची माहिती मिळताच मल्हार सेना सरसेनापती बबनरावजी रानगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हार सेना करवीर तालूका अध्यक्ष विक्रम शिणगारे, जिल्हा संघटक सुरेश लांडगे, खुपीरे ग्रा. प. सदस्य भगवान हराळे, संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक बबन शिणगारे, विठू गावडे यांनी वाकरे येथे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन संबधित धनगर बांधवास भेटून घडलेल्या प्रकारची माहिती घेतली. तसेच तेथील वैदयकीय अधिकारी डॉ. गायकवाड व त्यांचे सहकारी महेश शिंदे यांना घटनास्थळी बोलावून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती देण्यास सांगितले.

या घटनेचा पंचनामा करून धनगर बांधवास नुकसानभरपाई देणेबाबत सूचना देणेत आली. तसेच इथून पुढे अशा होणाऱ्या घटनेपासून धनगर बांधव व शेळी मेंढरांचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी खुपिरेचे सरपंच दिपाली जांभळे, उपसरपंच युवराज पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच तंटामुक्त अध्यक्ष व गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होते.









