सातारा / प्रतिनिधी :
वाई तालुक्यात दोन वेगवेगळय़ा घटनांमध्ये पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सर्जेराव सणस यांनी दिलेल्या खबरीनुसार संतोष कांबळे (वय 38, सध्या रा. आसरे) हा दि. 9 ते दि. 12 रोजीच्या दरम्यान, तांबडेवाडी नावच्या शिवारात सार्वजनिक विहिरीत पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. हवालदार पवार हे तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत शंकर नेताजी फडतरे यांनी दिलेल्या खबरीनुसार सारिका नेताजी फडतरे ही कपडे धुण्यासाठी दि. 12 रोजी बोपर्डी येथील ओढय़ावर गेली होती. कपडे धुवून झाल्यानंतर केस धुण्यासाठी ती ओढय़ात उतरली. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. महिला पोलीस नाईक माने अधिक तपास करत आहेत.









