पोलीस ठाण्यात मात्र विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल
प्रतिनिधी / सातारा
वाई तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या कृपेने गुंडगिरी फोफावली आहे. सर्वसामान्य व्यक्तीवर अन्याय होऊन त्याच्यावर झालेल्या अन्यायाची दखल साध्या पद्धतीने घेतली जाते. अशाच एका गावातील गावातील सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या गावगुंडाने तालुक्यातील एका महिलेवर अत्याचार केल्याची वाई तालुक्यात जोरदार चर्चा आहे. पोलीस ठाण्यात मात्र विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल असून पोलीस मॅनेज झाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
तालुक्याला किसन वीर आबा, मदन अप्पा यांच्या विचारांचा वारसा आहे. इतिहास काळापासून वाई तालुक्याला महत्व आहे. मात्र अलीकडच्या काळात विचार गायब होऊन गावोगावी सावकारी, जमीन खरेदी विक्री व्यवसाय करणारे, वाळू व्यवसाय करणाऱ्यांचे स्तोम वाढू लागले आहे. तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांचे यांना अभय असल्याने यांचा व्यवसाय जोरात सुरू आहे. तालुक्यातील एका गावातील सावकारांकडून एका महिलेवर अत्याचार झाल्याची तालुक्यातील गावागावात चर्चा सुरू आहे.मात्र, त्या सावकाराचे वजन राजकीय दरबारी असल्याने पोलिसांनी अत्याचाराऐवजी विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई पोलीस मॅनेज झाले असल्याची दबक्या आवाजात चर्चा रंगत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









