सातारा / प्रतिनिधी
एकट्या वाई शहराची कोरोना बाधितांचा आकडा शंभर समीप पोहचला आहे.शहरात दोन बाधितांचा मृत्यू झाला असून मृत एक बाधित हा पोलीस ठाण्याच्या समोरच रहात होता.दुसरा मृत बाधित ब्राम्हणशाही येथील आहे.रात्रीच्या अहवालात आणखी एक पोलीस जवान बाधित आढळून आला असून आतापर्यंत वाई पोलीस ठाण्यातले 16 जवान झाले आहेत.त्यांच्या कुटूंबातले सदस्य बाधित झाले आहेत.हळूहळू वाई शहरातला विळखा घट्ट होत आहे.
वाई शहरातील कोरोना बाधितांचा आकडे वाईकरांचा काळजाचा ठोका चुकवू लागले आहेत.वाई शहरातील व्यापाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.पोलीस जवान अडकून राहिले आहेत.रात्रीच्या आलेल्या अहवालात 16 जण पॉझिटिव्ह तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाईतील ब्राम्हणशाही येथील 50 वर्षीय पुरुष आणि सोनगीरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष यांना सारी ची बाधा झाल्याने दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान कोरोना संशयित म्हणून घेण्यात आलेला नमुना बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. मात्र उपचारादरम्यान यांचा मृत्यु झाला आहे.
त्यांच्यावर सातारा येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर बाधित आढळून आलेल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी, नऊ बाधीत पोलीस कर्मचाऱ्यांचे सहवासीत नातेवाईक, सोनगिरवाडी 2 सातारा येथील कर्मचारी वाई रहिवासी 1,धोम पुनर्वसन 1,यशवंत नगर 1,ब्राह्मणशाही 1 यांचा समावेश आहे.
गरवारे कंपनीने कामगार परत पाठवले
वाई शहराचा करोना बाधीतची संख्या शंभर होतांना आढळून येत आहे. यामुळे शहराचा समावेश कँटोमेन्ट झोन माध्ये झाला आहे. आज वाई एमआयडीसीतील गरवारे वॉल रोप्स सह इतर आस्थापणातील अनेक कामगार कँटोमेन्ट झोन मधून येत असल्याने शासन नियमानुसार कामावर घेण्यास नकार देत घरी पाठविण्यात आले आहे. वाई शहरातून जाणारे गरवारेचे साडेतीनशे चारशे कर्मचारी घरी परत आल्याचे समजते.
आमदारांच्या गावात कोरोना
आमदार मकरंद पाटील यांच्या बोपेगावात दोन दिवसांपूर्वी एक महिला बाधित आढळून आली.ती महिला पसरणीला पाहुण्याकडे गेली होती.तेथून आल्यानंतर तिला त्रास जाणवू लागला होता आता ती उपचार घेत आहे.तसेच रात्रीच्या रिपोर्टमध्ये पाचवड येथील 25 आणि 4 वर्षीय महिला, ओझर्डे (धोम-पुनर्वसन) येथील 57 वर्षीय पुरुष यांचा ही समावेश आहे.








