वार्ताहर / वांगी :
कडेगाव तालुक्यातील वांगी येथे लोकसहभागातून सुरु असलेले अंबिकादेवी कोविड सेंटर संपूर्ण जिल्ह्यात आदर्शवत आहे. येथील रुग्णांना मिळत असलेल्या सोयी-सुविधांवरुन स्पष्ट होते. या मोठ्या गावातील रुग्णसंख्या शुन्यावर येईपर्यंत सेंटर सुरु ठेवा. तुम्हाला पाहिजे ती मदत देण्यास सदैव तयार असल्याचे प्रतिपादन कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
वांगी येथे वाढत असलेली कोरोना साखळी खंडित करण्यासाठी लोकवर्गणीतून आणि दक्षता कमिटीच्या पुढाकाराने सुरु असलेल्या अंबिकादेवी कोविड सेंटरला आज सकाळी डॉ. विश्वजित कदम यांनी भेट दिली. याठिकाणी दाखल सर्व रुग्णांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच मिळत असलेल्या वैद्यकीय आणि भोजन व्यवस्थेची माहिती घेतली आणि समाधान व्यक्त केले. तसेच वांगी गाव मोठे असून वाड्या-वस्त्यावर विखुरले आहे. त्यामुळे रुग्णवाढ झपाट्याने होते. त्याची साखळी तोडण्यासाठी विलगीकरण कक्षाचा उत्तम उपाय तूम्ही काढला आहात. तो योग्य आहे. या सेंटरला लोकांचा आर्थिक आधार मिळाला हे स्तुत्य आहे. भविष्यात काहिही अडचण आल्यास कळवा सर्वतोपरी मदत केली जाईल. असे आश्वासन त्यानी दिले.
याप्रसंगी डॉ. जितेश कदम, सरपंच डॉ. विजय होनमाने, उपसरपंच संजय कदम, माजी उपसरपंच राहुल साळुंखे, बाबासो सुर्यवंशी, यशवंत कांबळे, माजी जि.प.सदस्य सुरेश मोहिते, दिपक सुर्यवंशी तसेच वांगी उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








