प्रतिनिधी/ बेळगाव
वसंत व्याख्यानमालेची बैठक मंदाकिनी दप्तरदार यांच्या कौमुदी या शिवाजी कॉलनी येथील निवासस्थानी पार पडली. अध्यक्षस्थानी व्याख्यानमालेच्या अध्यक्षा मीना खानोलकर होत्या.
सदर बैठकीत एप्रिलमध्ये होणाऱया वसंत व्याख्यानमालेच्या रूपरेषेबाबत तसेच वक्त्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षीही साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील वक्त्यांना निमंत्रित करून व्याख्यानमाला यशस्वी करूया, असे खानोलकर यांनी सांगितले. तसेच स्वरुपा इनामदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अन्य विषयांवरही चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी माधुरी शानभाग, सुमन रानडे, सुनीता देशपांडे, प्रियंका केळकर, अश्विनी ओगले, शिल्पा लांडगे, विजया पुजारी, धनश्री नाईक, दीपा देशपांडे यांच्यासह बहुसंख्य सदस्या उपस्थित होत्या.









